Uttam Kamble who is in the Yavatmal Washim Lok Sabha constituency will again contest the election
Uttam Kamble who is in the Yavatmal Washim Lok Sabha constituency will again contest the election 
विदर्भ

Loksabha 2019 : अनामत रकमेसाठी फोडला गल्ला; उत्तम कांबळे पुन्हा रिंगणात

मंगेश पारटकर

लोकसभा 2019
शेंबाळपिंपरी : निवडणूक लढणे धनदांडग्यांचे काम, असे उद्गार सुशिक्षित तरुणांच्या तोंडून ऐकायला मिळते. त्याला उत्तम भगाजी कांबळे नेहमीच अपवाद ठरत आले आहे. घरात अठरा विश्‍व दारिद्र्य असताना नामांकन भरताना अनामत रक्कम भरण्यासाठी या ध्येयवेड्या उमेदवाराने चक्क पै-पै गोळा करून भरलेला गल्ला फोडला असून, कांबळे पुन्हा यवतमाळ-वाशीम लोकसभा मतदारसंघात आपले भाग्य आजमावत आहेत.  

निवडणूक म्हटले की, प्रत्येकाला अवलिया उमेदवाराची आठवण येतेच आणि नावही पूर्ण ‘उत्तम भगाजी कांबळे’ हे उच्चारल्या जाते. त्यांनी आतापर्यंत 29 निवडणुका लढल्या आहेत. प्रत्येक निवडणुकीत त्यांच्या पदरी पराभव आला. तरीदेखील ते निराश झालेले नाहीत. यंदाही लोकसभा लढण्याची पूर्ण तयारी त्यांनी केली. त्यासाठी पै-पै गोळा भरलेला गल्ला फोडला. त्यातून 13 हजार 500 रुपयांचा मोठा आधार मिळाला. काही रकम कमी पडल्याने वृध्द आईच्या गळ्यातील मंगळसूत्र मोडून अनामत रकमेची तजवीज केली. विशेष म्हणजे आपल्या लाडक्या लेकाचा आग्रह प्रत्येकवेळी त्यांच्या आईने पुरविला आहे. सोमवारी (ता. 25) यवतमाळ येथे प्रबुद्ध रिपब्लिकन पक्षातर्फे नामांकन दाखल केले. गावपरिसरात ‘आमदार’ या नावानेच लोक कांबळे यांच्याशी संवाद साधतात. 46 वर्षीय कांबळे यांनी ग्रामपंचायत ते लोकसभेपर्यंत आतापर्यंत 29 वेळा निवडणुका लढविल्या असून, ही तिसावी निवडणूक आहे. त्यांनी सात वेळा ग्रामपंचायत, एकदा जिल्हा परिषद, तीनवेळा पंचायत समिती, चारवेळा तंटामुक्ती गाव समिती, चार वेळा लोकसभा, सहा वेळा विधानसभा, विद्यार्थी दशेत तीन व एक पोटनिवडणूक लढविली. केवळ नामांकनच दाखल करीत नाही. तर, पोटतिडकीने सायकलद्वारे गावागावात जाऊन मतदारांशी संपर्क साधतात. निवडणूक लढविण्यासाठी यापूर्वी त्यांनी घरातील पूर्ण शेळ्या विकल्या. आपली लढाई ही धनदांडग्यांच्या विरोधात असून गोरगरीब जनता एक दिवस आपल्याला निवडून देईल, असा विश्‍वास कांबळे बोलून दाखवितात.  अशी त्यांची श्रद्धा आहे. कोणताही उमेदवार जनतेच्या प्रश्‍नावर पोटतिडकीने बोलत नाही, ही खंत त्यांनी व्यक्त केली. 

आईने काढून दिलं मंगळसूत्र -
चांगल्या कामासाठी मंगळसूत्र विकायच...तर मग विक..., हे शब्द आहेत, उत्तम कांबळे यांच्या आईचे. लेकाचा हट्ट पुरविण्यासाठी मायने गरज पडली, त्यावेळी शेळ्या विकण्यास परवानगी दिली. पदरमोड करून जमा केलेली पुंजी लेकाच्या हवाली केली. तिला माहित आहे, आपला लेक प्रामाणिक आहे. गोरगरीबांच भल्यासाठी तो राबत आहे.

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपासून दूर -
उत्तम कांबळे यांनी ग्रामपंचायतीपासून ते लोकसभेपर्यंतच्या निवडणुका लढविल्या आहेत. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढण्यासाठी ते इच्छुक होते. मात्र, सूचक व अनुमोदक न मिळाल्याने त्यांना नाइलाजास्तव माघार घ्यावी लागली होती. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत त्यांनी प्रतिस्पर्धी कोट्यधीश उमेदवारांना आश्‍चर्यचकित करणारी मते घेतल्याचा इतिहास आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Mhaske: म्हस्केंच्या उमेदवारी विरोधात भाजपत नाराजी; नवी मुंबईतील 65 पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

SRH vs RR Live IPL 2024 : राजस्थान क्वालिफाय करणार की हैदराबाद मजबूत स्थितीत पोहचणार?

Fact Check : एकाच व्यक्तीकडून भाजपला पाच मत देणारा 'तो' व्हिडीओ दिशाभूल करणारा; व्हायरल होत असलेला व्हिडीओ 'मॉक पोल' चा

PPF : दररोज 250 रुपये वाचवून तयार होईल 24 लाखांचा फंड, कसा ते वाचा ?

Rinku Singh T20 WC 2024 : रोहितला जास्त पर्याय... रिंकू सिंहला वगळण्याबाबत अजित आगरकर काय म्हणाला?

SCROLL FOR NEXT